या हुतातम्यांना श्रद्धांजली वाहून
मी माझे कर्तव्य पार पाडले
आता मी मोकळा झालो
माझ्या नेहमीच्या सुरक्षित विश्वात परतायला
माझ्यापासून सुरू होणारा दिवस
माझ्यावरच संपवायाला
आता हरकत नाही विसरायला नागारिकत्वाची कर्तव्यं
ज्यांचा मीच उदो उदो केला होता
माझ्या श्रद्धांजलीच्या भाषणात,
आणि व्हायला हवं तैयार लढायला
नित्य नव्या हक्कांसाठी
आता करायला हवी जात - धर्म - प्रांत यांची चिकित्सा
आणि काळजीपूर्वक निवडायला हवेत सोयीस्कर गुन्हेगार
आमच्या अप्रगतीचं खापर माथी मारायला
कदाचित पुन्हा कधीतरी हल्ला होईल
पुन्हा काहीजण हुतात्मे होऊन मला वाचवतील
तसा माझा हक्कच आहे तो
पण तरीही मी पुन्हा येइन - माझं कर्तव्य करायला
अर्थात पुन्हा श्रद्धांजली वाहायला !
Saturday, February 28, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment