Tuesday, February 3, 2009

कविता - मी मुंबई

उद्ध्वस्त झालेल्या अस्तित्वाच्या ढिगाखालून मी बाहेर पड़ते,
अंगावरची धूळ झटकते आणि चालू लागाते.
नंतर लोक उकारत बसतात तो ढिगारा
पण मला त्याचं काय?
आणि मला तेवढा वेळ तरी कुठेय?
मला चलायालाच हवं, नव्हे धावायला हवं
मी थांबले, तर सगळ्यांची पोटं कशी भरणार?
न भरली तर न भरू देत मला काय?
मी काय मक्ता घेतलाय त्या सगळ्या पोटांचा?
पण - रोखलेल्या बोटांपेक्षा भुकेली पोटं बरी वाटतात
त्यात एकदा घास पडला की कावकाव बंद !
मला मारणार ? -- मी भीत नाही
छे छे -- मी अमर वगैरे नाही
पण मेलेल्याला काय मारणार ?
मला केंव्हाच खाऊन पचवलय -- त्या सगळ्या पोटांनी!

No comments:

Post a Comment